‘वोट चोर, गद्दी छोड!’ च्या घोषणांनी फैजपूर दणाणले; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक इदू पिंजारी फैजपूर (संपादक : ...
‘वोट चोर, गद्दी छोड!’ च्या घोषणांनी फैजपूर दणाणले; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून पायी मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेचीही मागणी करत
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून फैजपूर मध्ये काँग्रेसने शनिवारी आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी मोर्चा छत्री चौकात येऊन जोरदार निदर्शने यावेळी करण्यात आले. फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. मोर्चानंतर राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
प्रदर्शनात सहभागी कार्यकर्त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. ‘ज्ञानेश कुमार मुर्दाबाद’, ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ आणि ‘वोट चोर, गद्दी छोड!’ अशा निदर्शने करून घोषणा दिल्या याशिवाय भाजपला लक्ष्य करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या.
काँग्रेसने आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून ज्ञानेश कुमार यांनी विविध राज्यांमध्ये कथितरीत्या ‘चोरीची सरकारे’ स्थापन होण्यास मदत केली. या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले.
राजीनाम्यानंतर अटकेचीही मागणी
फैजपूर शहर काँग्रेस कमिटी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी केली. त्यांच्या मते, ज्ञानेश कुमार यांना या पदावर कायम राहण्याचा नैतिक अधिकार नाही. लोकशाहीचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी काँग्रेसचा संघर्ष यापुढेही सुरू राहील, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली.यावेळी
जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धनंजय चौधरी यांनीही शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तसेच यावेळी नगरसेवक अतुल पाटील नगरसेवक हकीम तडवी
काँग्रेस गटनेते शे. इरफान शे. इकबाल नगरसेवक डॉ. दानिश शे. नगरसेवक केतन किरंगे माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस कलीम मणियार
डॉ. गणेश चौधरी शहराध्यक्ष शेख रियाज आसिफ मेकॅनिकल, गणेश गुरव सर रामराव मोरे योगेश भावसार एजाज सर मुदस्सर नजर कामील मनियार आदी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments