adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मंगरूळ विद्यालयात वाचन प्रेरणा व जागतिक हात धुवा दिवस साजरा

मंगरूळ विद्यालयात वाचन प्रेरणा व जागतिक हात धुवा दिवस साजरा विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक : हेमकांत गायकवाड) मंगरूळ(ता चोपडा) येथील...

मंगरूळ विद्यालयात वाचन प्रेरणा व जागतिक हात धुवा दिवस साजरा



विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मंगरूळ(ता चोपडा) येथील श्रीमती आ खा पाटील माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रयोगशाळा सहाय्यक मयुर वाघ होते. 

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत गरुड यांनी केले.त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. "पुस्तक हाच खरा मित्र असतो, वाचनाने ज्ञान वाढते" असा संदेश दिला.

 विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करून मनोगत व्यक्त केले.यावेळी  ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

 जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सी.व्ही.पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणी आजारांपासून बचाव करण्यासाठी हात धुणे का गरजेचे आहे हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी"स्वच्छ हात, निरोगी शरीर" अशा घोषणा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी यु जाधव यांनी केले.तर आभार  एम.यु.पाटील यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....मंगरूळ(ता चोपडा)कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर

No comments