adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर जे.टी. महाजन इंजीनियरिंग कॉलेजच्या संघाचे राष्ट्रीय नवोपक्रम २०२६ मध्ये यश

फैजपूर जे.टी. महाजन इंजीनियरिंग कॉलेजच्या संघाचे राष्ट्रीय नवोपक्रम २०२६ मध्ये यश इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) नवकल्पना, ...

फैजपूर जे.टी. महाजन इंजीनियरिंग कॉलेजच्या संघाचे राष्ट्रीय नवोपक्रम २०२६ मध्ये यश



इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


नवकल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जळगाव येथे आयोजित ‘राष्ट्रीय नवोपक्रम २०२६’ या उपक्रमात EcruxBot च्या संघाने उल्लेखनीय यश संपादन केले. या कार्यक्रमात जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फैजपूर मधील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विरेंद्र वाल्हे यांच्यासह EcruxBot ची संपूर्ण टीम उपस्थित होती. या उपक्रमातील यशामुळे संघाच्या नाविन्यपूर्ण कार्याला प्रोत्साहन मिळाले आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सरदार वल्लभभाई पटेल भवन, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगावच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हा उद्योग केंद्राचे संतोष गावळी तसेच MIDC च्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती दीपाली रासवे यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

     या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाधारित उपायांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. नवउद्योजक, विद्यार्थी आणि नवकल्पकांना आपल्या कल्पना सादर करण्याची तसेच त्यांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळाली.


         EcruxBot च्या संघाने या स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपल्या कामगिरीची छाप उमटवली. या यशामुळे संघातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढला असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे. विद्यार्थी आणि युवा उद्योजकांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव व्ही .आर. झोपे, सहसचिव शशिकांत चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी.इ.चौधरी, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments