adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संकटात कार्यकर्त्यांसाठी धावून आले आमदार नंदू भाऊ महाजन; ३८ दिवसांच्या उपचारांनंतर संदीप सावळे सुखरूप घरी!

 संकटात कार्यकर्त्यांसाठी धावून आले आमदार नंदू भाऊ महाजन; ३८ दिवसांच्या उपचारांनंतर संदीप सावळे सुखरूप घरी!  चिमुकल्याचे ‘थँक्यू बाबा, माझ्य...

 संकटात कार्यकर्त्यांसाठी धावून आले आमदार नंदू भाऊ महाजन; ३८ दिवसांच्या उपचारांनंतर संदीप सावळे सुखरूप घरी! 

चिमुकल्याचे ‘थँक्यू बाबा, माझ्या पप्पांना सुखरूप घरी आणल्याबद्दल’ हे भावनिक शब्द ऐकून महाजन भावुक 




मुबारक तडवी रावेर 

[संपादक- हेमकांत गायकवाड]

 संकटाच्या काळात कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला मदतीचा हात देणे, हीच खरी माणुसकी असल्याचा प्रत्यय भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सदाशिव सावळे यांच्या उपचारांदरम्यान आला. गंभीर प्रकृतीमुळे त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचारांसाठी आवश्यक मदत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार नंदकिशोर महाजन यांची नुकतीच सावळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट झाली. यावेळी सावळे यांच्या चिमुकल्या मुलाने, “Thank you, बाबा! माझ्या पप्पांना सुखरूप घरी आणल्याबद्दल...” असे भावनिक शब्द व्यक्त केले. या निरागस शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत असताना जळगावचे नगरसेवक अरविंद देशमुख यांचा फोन आला. भाजपा जळगाव पूर्व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळताच विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून सावळे यांना रात्री दोन वाजता मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तब्बल ३८ दिवसांच्या उपचारांनंतर संदीप सावळे सुखरूप घरी परतले. त्यांच्या उपचारांसाठी अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असताना धर्मादाय विभागाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळाल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

‘संकटात धावून येणारी माणसे देवमाणसे असतात’

संदीप सावळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. यावेळी सावळे यांच्या पत्नीने, “सद्गुरूंनी तुम्हाला देवदूत बनवून आमच्या मदतीसाठी पाठवले,” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. कुटुंबीयांच्या या भावनिक प्रतिक्रियांनी नंदू भाऊ महाजनही भारावून गेले. संदीप सावळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना, संकटाच्या काळात नंदू भाऊ महाजन यांनी दिलेला आधार आयुष्यभर विसरता येणार नसल्याचे सांगितले. एका सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात स्वतः पुढाकार घेऊन उपचारांची व्यवस्था करणे आणि शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. राजकारणात अनेक नाती निर्माण होतात; मात्र संकटाच्या वेळी कुटुंबाप्रमाणे पाठीशी उभे राहणारी माणसे आयुष्यभर लक्षात राहतात, अशा भावना सावळे यांनी व्यक्त केल्या. नंदू भाऊ महाजन यांच्या मदतीबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

‘कार्यकर्ता हा माझ्या कुटुंबाचा घटक’

या भेटीदरम्यान आमदार नंदकिशोर महाजन महाजन यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षामुळे समाजसेवेची संधी मिळाली असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून जनतेसाठी काम करण्याचे बळ मिळाले आहे. कार्यकर्ता हा केवळ पक्षाचा सदस्य नसून कुटुंबातील एक घटक आहे. त्यामुळे त्याच्यावर संकट आले असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संदीप सावळे यांना उत्तम आरोग्य लाभावे, ते पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनसेवेत सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली. संकटाच्या काळात मिळालेली मदत, कुटुंबीयांच्या डोळ्यांतील समाधान आणि चिमुकल्याच्या तोंडून उमटलेले कृतज्ञतेचे शब्द हे राजकारणा पलीकडील माणुसकीचे दर्शन घडवणारे ठरले.

No comments