धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन इदू पिंजारी फैजपूर (संपादक : हेमकांत गायकवाड) फ...
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे २ ऑक्टोबर २०२६ धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर राष्ट्रीय सण उत्सव समितीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त कार्यक्रमात आदरांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले.
उपप्राचार्य प्रा.मनोहर सुरवाडे यांनी म. गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून महात्मा गांधींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. उपप्राचार्य डॉ.हरिष नेमाडे यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
प्रा.दिपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सण महोत्सव समितीचे चेअरमन डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान म.गांधीजींचे विचार, दिवंगत पंतप्रधान शास्त्रीजींची साधी जीवनशैली व त्यांची राष्ट्रनिष्ठा व जीवन कार्य यांचा उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये म.गांधी-शास्त्रींच्या विचारांचे प्रेरणादायी बीज रोवले गेले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments