प्रांताधिकार्यांच्या आदेशाला नंदगांव ग्रामपंचायतीने दाखवली केराची टोपली; नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाईची शक्यता एक वर्ष उलटूनही प्र...
प्रांताधिकार्यांच्या आदेशाला नंदगांव ग्रामपंचायतीने दाखवली केराची टोपली; नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाईची शक्यता
एक वर्ष उलटूनही प्रांताधिकारिंचा आदेश कागदावरच
जळगांव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगांव : नंदगांव ता.जळगांव येथील सार्वजनिक जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज ओट्याजवळ तसेच इतर जागेवर बेकायदेशीरपणे गुरे-ढोरे बांधून व बैलगाडी सोडून ठेवल्याप्रकरणी आणि शासकीय जागेवरील इतर समस्या सोडवण्याबाबत आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (प्रांताधिकारी) यांनी दिला होता. प्रांताधिकार्यांनी दिलेल्या आदेशाला एक वर्ष उलटूनही ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे. सविस्तर वृत्त असे की, नंदगावातील सार्वजनिक जागेवर विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज ओट्यासारख्या सार्वजनिक व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी तसेच इतर गल्लीमध्ये काही लोकांकडून सातत्याने गुरे-ढोरे बांधली जात होती, तसेच बैलगाड्या सोडून अडथळा निर्माण केला जात होता. शासकीय जागेवर अतिक्रमण करून गुरे- ढोरे बांधून तसेच मलमूत्र व दूषित पाणी रस्त्यावर सोडून सार्वजनिक शांतता व आरोग्यास धोका निर्माण होत असल्यामुळे पीडित ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाकडे दाद मागितली होती.
यावर दि.२६/०९/२०२५ रोजी सुनावणी होऊन प्रांताधिकार्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १५२ नुसार (सार्वजनिक उपद्रव व शांतता भंगास प्रतिबंध) अंतर्गत या सर्व प्रकाराचा परिपूर्ण बंदोबस्त करावा आणि शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे असे सांगण्यात आले होते व अशा स्वरूपाचे स्पष्ट आदेश ग्रामपंचायतीला दिले होते. एक वर्ष झाले तरीही नंदगांव ग्राम पंचायतीमार्फत आजतागायत कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झाली नाही असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.तसेच त्याचे पुरावे देखील ग्रामस्थांकडे आहेत. सदरील नंदगांव ग्राम पंचायत ही सदरील गुरे-ढोरे बांधणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला हाताशी घेऊन पंचायत समितीकडून देखील दि.१०/०८/२०२६ रोजी वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा अहवाल प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला आहे याचे देखील पुरावे ग्रामस्थांकडे उपलब्ध आहे.
दरम्यान बाब अशी की, ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न करता, दिशाभूल करणारा अहवाल प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाला सादर केला आहे. सदरील ग्राम पंचायतने आदेशाची उल्लंघन करून अवहेलना केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय कामात कमालीची अनियमितता आणि कारभाराबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत खालावलेल्या पातळीवर सुरू आहे. शासकीय कामांमध्ये प्रचंड अनियमितता आणि वेळेवर कामे न करणे अशा तक्रारी नागरिकांकडून वाढल्या आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामस्थांकडून निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित घेतले जात आहेत. सामान्य नागरिकांना क्षुल्लक कामांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
प्रांताधिकारी यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करून मनमानी कारभार केल्याप्रकरणी संबंधित ग्रामपंचायतीवर आणि ग्राम पंचायत अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तालुक्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे

No comments