adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलिसांची हातभट्टी दारू विरोधात धडक मोहीम पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल; ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट

रावेर पोलिसांची  हातभट्टी दारू  विरोधात धडक मोहीम  पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल;  ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट    रावेर प्रतिनिधी मुबारक...

रावेर पोलिसांची हातभट्टी दारू विरोधात धडक मोहीम पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल;

 ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट   


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यात हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध रावेर पोलिसांनी धडक मोहीम राबविली. या कारवाईत विविध ठिकाणी छापे टाकून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा तसेच तयार दारूचा साठा असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.या धडक कारवाई ने अवैध गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत  या कारवाई दरम्यान रावेर पोलिसांनी पोलीस स्टेशनचे हद्दीतील पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. हातभट्टी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच सामाजिक वातावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. 


केलेल्या कारवाईत रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील कुसुंबा बिट

१)दिपक सुरेश भालेराव वय 42 वर्षे रा. कुसुंबा खु.ता. रावेर जि. जळगाव

20 लिटर गा.हा.भ. दारु

गुळ मोह मिश्रीत 100 लिटर कच्चे रसायन व 150 लिटर पक्के रसायन

अंदाजे किंमत १९,०००/-

२) के-हाला बीट

विस्मील्ला चांदखाँ तडवी रा. पाडला

लिटर 120 गा.हा.भ.दारु

25 लिटर गुळ मोह मिश्रीत उकळते रसायन व 35 लिटर गुळ मोह मिश्रीत कच्चे रसायन

१७५००/-

३) के-हाला बिट

असलम हसन तडवी वय रा पाडला ता रावेर

160 लिटर गा.हा.भ. दारु

गुळ मोह मिश्रीत 30 लिटर उकळते रसायन व 40 लिटर गुळ मोह मिश्रीत कच्चे रसायन २३०००/-

४)रावेर पोलीस स्टेशन पाल बिट

कृष्णा मधुकर राठोड वय 27 वर्षे रा. पाल रावेर

15 लिटर गा.हा.भ. दारु १५००/-

५)रावेर पोलीस स्टेशन अंजदा बिट

सुपडु भिवसन तायडे रा. नेहता रावेर 30 लिटर गा.हा.भ. दारु

गुळ मोह मिश्रीत 100 लिटर कच्चे रसायन व 150 लिटर पक्के रसायन

२००००/-असा एकत्रितपणे ८१ हजार रुपये किंमतीचे कच्चे रसायन हातभट्टी दारु व साहित्य रावेर पोलीसांनी नष्ट केले

रावेर परिसरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सदरची कारवाई 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या आदेशानुसार एपीआय अमूल बच्छाव पीएसआय मनोज महाजन गुन्हे शाखेचे पो कॉ संभाजी बिजागरे पो कॉ.विशाल पाटील पो कॉ प्रमोद पाटील,  पो कॉ श्रीकांत चव्हाण पो कॉ सुकेश तडवी पो कॉ विकार शेख आदिसह डीबी पथकाने केली

No comments