adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत चोपडा तालुक्यात दोन दिवसीय पदयात्रा व जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

 ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत चोपडा तालुक्यात दोन दिवसीय पदयात्रा व जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकां...

 ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत चोपडा तालुक्यात दोन दिवसीय पदयात्रा व जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्या चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ या अभियानांतर्गत दि. १८ व १९ ऑक्टोबर २०२६ रोजी चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये पदयात्रा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडले.

या अभियानांतर्गत दि. १८ ऑक्टोबर रोजी लासूर, घोडगाव व चहार्डी, तर दि. १९ ऑक्टोबर रोजी धानोरा, अडावद व विरवाडे येथे पदयात्रा काढून नागरिकांमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यात आली. हे कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचे संरक्षण, भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूक राहावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.

यावेळी ‘वोट चोर – गद्दी छोड’ अशा घोषणा देत मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण या मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला.

दोन दिवसांच्या या अभियानामुळे चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यास चालना मिळाली. लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले.यावेळी

कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेशबापू पाटील, तालुकाध्यक्ष मोहन पाटील,शहराध्यक्ष अशोक साळुंखे,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे,जिल्हा सचिव आरिफ शेख, जिल्हा सचिव संजीव सोनवणे, माजी शहर अध्यक्ष के डी चौधरी सर,प्रकाश पाटील,जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद पाटील, डॉ बी आर पाटील,नगरसेवक रमाकांत ठाकूर,विजय पाटील, तापी सह सूत संचालक देविदास सोनवणे, नंदलाल माळी,महेश पाटील, एकनाथ पाटील, शेतकी संघ मा.व्हा चेअरमन बाळकृष्ण पाटील, दयाराम पाटील, अरुण कखरे,अशोक पाटील, अतिथोष पाटील, डॉ पराग पाटील,नारायण पाटील,प्रकाश पाटील, युवराज धनगर आनंदराव रायसिंग,विजय पाटील, भरत पाटील, ललित पाटील,अशोक पाटील,दगा कोळी,मासुम तडवी, योगेश पाटील, युवराज महाजन,वसंतराव पाटील,रविंद्र महाजन,रामचंद्र महाजन ,वसंत महाजन,निळकंठ महाजन,राजेंद्र चौधरी,दिनकर चौधरी,प्रकाश पाटील,मुसा शेख ,शब्बीर पिंजारी,डिगंबर पाटील,नवाब तडवी,जहागीर पठाण ,असेख खा आरजे खा,फकिरा तडवी , बुरखा तडवी,मोहिनुद्दी शेख ,इम्रान शेख,राजू कोळी,मधुकर पाटील एकनाथ कोळी,राजू धनगर, राम भाई,भगीरथ कोळी, ढोलू पाटील ,प्रमोद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments