चित्रकार सुनील दाभाडे यांचा जिल्हा पोलीस दलातर्फे सन्मान जळगांव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आय...
चित्रकार सुनील दाभाडे यांचा जिल्हा पोलीस दलातर्फे सन्मान
जळगांव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री गणेश आरास व मिरवणूक’ स्पर्धेचे परीक्षण उत्कृष्टरीत्या केल्याबद्दल मानव सेवा विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक तथा चित्रकार श्री. सुनिल दाभाडे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे श्री गणेश आरास व मिरवणूक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण करण्याची जबाबदारी चित्रकार व कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी पार पाडली. त्यांनी विविध गणेश मंडळांच्या आरास, कलात्मक मांडणी, सामाजिक संदेश तसेच मिरवणुकीतील विविध बाबींचे बारकाईने परीक्षण केले.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, दीपक जोशी,परिक्षक शरद भालेराव, राजेश शिंपी, सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुनील दाभाडे यांच्या या सन्मानाबद्दल कला व शिक्षण क्षेत्रातील संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी व सदस्य प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका अलका महाजन सर्व सहकारी शिक्षक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments