राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात फैजपुर प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गा...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात
फैजपुर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा (ग्रामीण पुर्व विभाग) चे जिल्हाध्यक्ष मा. धनंजय भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे शहरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रभातफेरीचा आरंभ करण्यात आला व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फैजपूर कॉंग्रेस अधिवेशनाच्या स्मारकापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. स्मारकाजवळ प्रार्थना करून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला वंदन करून प्रभातफेरीची सांगता झाली.
याप्रसंगी शहराध्यक्ष रियाज शेख , नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक इरफान शेख, माजी नगरसेवक कलिम मण्यार, माजी नगरसेवक महेबुब पिंजारी, माजी नगरसेवक रामा चौधरी, गणेश गुरव सर , रामराव मोरे , आसिफ मेकॅनिक , डॉ गणेश चौधरी, तुषार राणे, योगेश भावसार, कुणाल चौधरी आणि इतर कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

No comments