चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न चोपडा (प्रतिनिधी): [संपादक - हेमकांत गायकव...
चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न
चोपडा (प्रतिनिधी):
[संपादक - हेमकांत गायकवाड]
दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत महाविद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच सामाजिक व राष्ट्रीय जाणिवा समृद्ध व्हाव्यात, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेसाठी भारताची राष्ट्रीय प्रतीके (राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फूल, राजमुद्रा इ.), सेवा संकल्प अभियान, अखंड भारत, विविधतेत एकता, स्वच्छ भारत अभियान, निसर्ग चित्र हे विषय देण्यात आले होते. या विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अत्यंत देखण्या, आकर्षक व विचारप्रवर्तक रांगोळ्या साकारल्या.
परीक्षकांनी जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार: प्रथम क्रमांक: दिव्या नंदिलाल कोळी, द्वितीय क्रमांक: प्रज्ञा वसंत पावरा आणि तृतीय क्रमांक: संदेश ज्ञाना रायसिंग यांनी प्राप्त केला. सदर स्पर्धेचे अत्यंत पारदर्शक व काटेकोर परीक्षण प्रा. डॉ. कल्पना सोनवणे, प्रा. डॉ. मोहिनी उपासनी आणि सौ. रुपाली देसाई, यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर,उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराती यांची विशेष उपस्थिती लाभली. आणि या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर उपक्रमाचे संयोजन व नियोजन 'सेवा संकल्प अभियान' समन्वयक प्रा. डॉ. मारोती गायकवाड आणि प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले.

No comments