बोरावल-टाकरखेडा शिवारात महिलेची सोन्याची पोत हिसकावली! दुचाकी घटनास्थळी सोडून संशयित पसार; शेतमजूर महिलांमध्ये भीतीचे वातावरण भरत कोळी य...
बोरावल-टाकरखेडा शिवारात महिलेची सोन्याची पोत हिसकावली!
दुचाकी घटनास्थळी सोडून संशयित पसार; शेतमजूर महिलांमध्ये भीतीचे वातावरण
भरत कोळी यावल
[संपादक - हेमकांत गायकवाड]
यावल : बोरावल-टाकरखेडा शिवारात शेतमजुरीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावल शहरातील पाच ते सात महिला बोरावल-टाकरखेडा शिवारात शेतमजुरीसाठी गेल्या होत्या. दुपारी घरी परतण्याच्या तयारीत असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने महिलांना शिवीगाळ केली आणि त्यापैकी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपली दुचाकी घटनास्थळीच सोडून पळ काढला.
घटनेनंतर महिलांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. घटनास्थळी सोडलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

No comments