नवरात्रोत्सव आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा! उत्सव सर्वसमावेशक ऐकतेने शांततेत साजरा करा - पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर इतर धर्मीयां...
नवरात्रोत्सव आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा! उत्सव सर्वसमावेशक ऐकतेने शांततेत साजरा करा - पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर
इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील अशी गाणी वाजविणे टाळावेत - सपोनि मीरा देशमुख
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
[संपादक- हेमकांत गायकवाड]
रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील पोलीस स्टेशनचे वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी सदस्य,नवरात्र दुर्गा मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी नवरात्रोत्सव हा उत्सव आनंदोत्सव म्हणून एकतेने सोबतच सर्वानी एकत्रितपणे साजरा करण्याचे आवाहन केले
उत्सवादरम्यान कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच इतरांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याचीही काळजी घेण्यात यावी जो कोणी कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करेल त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे ही ते म्हणाले
निंभोरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी उत्सवादरम्यान इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील अशी गाणी वाजविणे टाळावेत तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा चुकीच्या पोस्ट प्रसारित करणे, ज्यामुळे कायदा सुव्यवस्था बाधित होऊन शांतता भंग होईल असे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही उत्सवादरम्यान सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी नवदुर्गा मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांना केले शांतता समितीच्या बैठकीत दुर्गादेवी उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करून उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे, पोलीस पाटील योगेश पाटील, पंकज बेंडाळे, रितेश चौधरी, स्वप्निल गिरडे आणि विजय सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिली. या बैठकीला दुर्गादास पाटील, अनिल बऱ्हाटे, मुन्ना पिंजारी, सचिन महाले, जयेश चौधरी, शेख इकबाल शेख गफूर यांच्यासह दुर्गादेवी उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य, पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोपनीय पोलीस पो कॉ अमोल वाघ यांनी केले. बैठक यशस्वीतेसाठी निंभोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अभय ढाकणे पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.

No comments