adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनवेल येथे नर्मदा परिक्रमावासीयांचा भक्तिभावात सत्कार श्री दादाजी दरबारात पूजन, आरती व नर्मदाष्टक पठण; स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव

  मनवेल येथे नर्मदा परिक्रमावासीयांचा भक्तिभावात सत्कार श्री दादाजी दरबारात पूजन, आरती व नर्मदाष्टक पठण; स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ दे...

 मनवेल येथे नर्मदा परिक्रमावासीयांचा भक्तिभावात सत्कार

श्री दादाजी दरबारात पूजन, आरती व नर्मदाष्टक पठण; स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव  


यावल तालुका प्रतिनिधी:

[संपादक - हेमकांत गायकवाड] 

यावल - मां जगदानंदी नर्मदाजी पायी परिक्रमा वासी मित्र परिवार, जळगाव खानदेश यांच्या वतीने  मनवेल येथील श्री दादाजी दरबारात नर्मदा मैय्याची पायी परिक्रमा पूर्ण केलेल्या १५ परिक्रमावासीयांचा भक्तिभावपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. यावेळी स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन परिक्रमावासीयांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नर्मदा मैय्याच्या पूजनाने झाली. त्यानंतर आरती व नर्मदाष्टक पठण करण्यात आले. गावातील भक्तगणांच्या उपस्थितीत परिक्रमावासीयांचा सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर परिक्रमावासीयांसाठी श्री संतोष दौलत पाटील यांच्या घरी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मनवेल येथील संतोष  पाटील,  दगडू  पाटील,  गोपाल पाटील,  चंद्रकांत  पाटील, चंपालाल पाटील,  चंद्रकांत पांडुरंग पाटील, सौ. निर्जला  पाटील, चिंधू  पाटील, सौ. अन्नपूर्णा चिंधू पाटील, सौ. दीपाली पाटील, पन्नालाल हुकुमचंद पाटील यांच्यासह नर्मदा मैय्याची परिक्रमा पूर्ण केलेल्या भाविकांचा सत्कार करण्यात आला.

तसेच निंबोल, ता. रावेर येथील  पांडुरंग महाराज, शिरसाड येथील  विष्णू भिरूळ व  घनश्याम भिरूळ आणि नांद्रा, ता. जळगाव येथील  डिगा कोळी यांचाही परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रेल येथील  लक्ष्मण पाटील, फुपनगरी येथील  दिलीप पाटील, वाघळूद बुद्रुक येथील  प्रदीप पाटील आणि वढोदा येथील श्री मच्छिंद्र पाटील यांनी स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ आणून सर्व परिक्रमावासीयांचा सत्कार केला. नर्मदा मैय्याच्या भक्तीभावाने भारलेल्या या कार्यक्रमातून परिक्रमावासीयांप्रती आदर, श्रद्धा आणि सेवाभाव व्यक्त करण्यात आला प्रास्तविक व सुत्रसंचालन पन्नालाल पाटील यांनी केले

No comments