ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी, विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक! विकास पाटील धरणगाव (संपादक : हेमकांत गायकवाड) धरणगाव : क्रीडा व...
ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी, विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक!
विकास पाटील धरणगाव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धरणगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या मार्फत आयोजित विभागीय शालेय ज्यूडो क्रीडा स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगावचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने दमदार कामगिरी करत १९ वर्षांआतील ८० किलो वजनी गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
नाशिक येथील यशवंत व्यायामशाळा, एम.जी. रोड येथे झालेल्या या स्पर्धेत कृष्णाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कृष्णाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक डी.एन. पाटील सर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. कृष्णाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन डी.जी. पाटील, सचिव सी.के. पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, उपमुख्याध्यापक ए.एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृष्णा महाजन व प्रशिक्षक डी.एन. पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले.
कृष्णाच्या या यशामुळे इंदिरा गांधी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कृष्णाला सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments