adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात चोपडा तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्याकडून शेतामध्ये जाऊन पाहणी

 पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात चोपडा तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्याकडून शेतामध्ये जाऊन पाहण...

 पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात

चोपडा तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्याकडून शेतामध्ये जाऊन पाहणी 


चोपडा  (प्रतिनिधी)  

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यासह राज्यातील अनेक भागांत यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे शेतीपिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराचे कष्ट आणि उत्पादनाची आशा संपुष्टात येत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी चोपडा तालुक्यातील चहार्डी, विचखेडा धुपे व भार्डू येथील शेतीशिवारांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती आणि झालेल्या संभाव्य आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेतली.

शेतातील पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. पावसाअभावी पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांनी केलेला मशागतीचा खर्च, बियाणे, खते आणि औषधांवरील गुंतवणूक वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, "चोपडा तालुक्यात निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ पावसाची कमतरता नसून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न बनली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके जळत असताना शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष परिस्थितीची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई तसेच वीजबिल, पीककर्ज व इतर बाबींमध्ये आवश्यक सवलती देऊन दिलासा द्यावा." चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे,जिल्हा सचिव आरिफ शेख, संजीव सोनवणे,तापी सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील,प्रकाश पाटील,विकास पाटील, नारायण पाटील,अशोक पाटील, युवराज कणखरे, विजय बोरसे,सुधाकर पाटील, पंकज पाटील,जितेंद्र चव्हाण, सातीलाल पाटील, शंकर ठाकूर, सुरेश पाटील, सूर्यकांत बोरसे, नवल कोळी, अमोल पाटील, विनायक पाटील, प्रवीण बोरसे ,रमेश बोरसे,बापू बोरसे, नंदू बोरसे, सोपान पाटील, विजय बोरसे, भरत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments