अंतुर्ली येथे दुर्गोस्तव मंडळातर्फे भंडाऱ्याचा व महाप्रसादाचे आयोजन प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) अंतुर्ली तालुका मुक्ताईन...
अंतुर्ली येथे दुर्गोस्तव मंडळातर्फे भंडाऱ्याचा व महाप्रसादाचे आयोजन
प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथील विविध दुर्गोत्सव मंडळातर्फे भंडाऱ्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चावडी येथे तरुण नवदुर्गा मंडळ सरदार वल्लभभाई पटेल नगर, आई तुळजाभवानी दुर्गा मंडळ छत्रपती शिवाजीनगर D वार्ड,सीता माता मंदिर नरवेल रोड व विविध मंडळातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .रक्तदान शिबिर ,संगीत खुर्ची ,दांडिया गरबा, किर्तन, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, रोग निदान शिबिरे ,बालगोपालांसाठी विविध उपक्रम विविध मंडळातर्फे राबविण्यात आले व त्याचा लाभ परिसरातील नागरिक यांनी घेतला.भंडाऱ्याचे आयोजन सर्व समाज बांधवांसाठी करण्यात आले महिला भगिनी, नागरिक,बाल गोपाल यांनी भंडाऱ्याचा स्वाद घेतला सर्व बंधू-भगिनी मंडळाचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

No comments