उज्जैनकर फाउंडेशनचा 17 वा वर्धापन दिन 27 डिसेंबर रोजी होणार भव्य स्वरूपात साजरा वर्धापन दिनात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारासह इयत्ता 10 ...
उज्जैनकर फाउंडेशनचा 17 वा वर्धापन दिन 27 डिसेंबर रोजी होणार भव्य स्वरूपात साजरा
वर्धापन दिनात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारासह इयत्ता 10 वी व 12 वी च्या तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावचा 17 वा वर्धापन दिन सोहळा दिनांक 27 डिसेंबर 2026 रविवार रोजी मुक्ताईनगर येथे मान्यवरांच्या तसेच फाउंडेशनच्या विविध जिल्हा, राज्य, विभाग व राष्ट्रीय कार्यकारिणीच्या
पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे याप्रसंगी राज्यातील व राज्याबाहेरील तापी पूर्णा राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये आदिशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार,आदर्श प्राचार्य, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, आदर्श पत्रकार, आदर्श समाजसेवक, आदर्श वक्ता, आदर्श निवेदक, आदर्श कर्मचारी, अधिकारी, आदर्श कला व क्रीडा आदि पुरस्कारांचा समावेश असेल त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या 17 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम अखंड राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव असे फाउंडेशन आहे आतापर्यंत चार राज्यस्तरीय व चार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्रामध्ये व गोव्या राज्यामध्ये यशस्वीरित्या आयोजित केलेले आहे नुकतेच चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नुकतेच 3 व 4 ऑक्टोबर 2026 रोजी अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशस्वी आयोजित केलेले आहे.

No comments