adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संघर्षशील महिलांसाठी माणुसकीचा आधार; ‘हक्काची भाऊबीज’ अभियानाचा संकल्प! भाऊबीज हा केवळ सण नसून प्रेम, आपुलकी आणि नात्यांचा उत्सव आहे. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत इनोव्हेटिव्ह मेकर्स अकॅडमी फाउंडेशन, नाशिक (IMAF) यांच्या वतीने ‘हक्काची भाऊबीज’ हे अभिनव अभियान राबविण्यात येत आहे.

संघर्षशील महिलांसाठी माणुसकीचा आधार; ‘हक्काची भाऊबीज’ अभियानाचा संकल्प! भाऊबीज हा केवळ सण नसून प्रेम, आपुलकी आणि नात्यांचा उत्सव आहे. याच भा...

संघर्षशील महिलांसाठी माणुसकीचा आधार; ‘हक्काची भाऊबीज’ अभियानाचा संकल्प!

भाऊबीज हा केवळ सण नसून प्रेम, आपुलकी आणि नात्यांचा उत्सव आहे. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत इनोव्हेटिव्ह मेकर्स अकॅडमी फाउंडेशन, नाशिक (IMAF) यांच्या वतीने ‘हक्काची भाऊबीज’ हे अभिनव अभियान राबविण्यात येत आहे.


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


समाजातील एकल, विधवा, एकल माता आणि परित्यक्ता महिलांना केवळ सणापुरती मदत न देता वर्षभर मायेचा आधार, सन्मान आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महिलांना कौशल्यविकास, रोजगार मार्गदर्शन, समुपदेशन आणि त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

‘महिलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मानाने जगण्याचे बळ हवे, या विचारातून ही चळवळ उभी राहत आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संवेदनशील नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन महिलांच्या आयुष्यात आशेचा नवा दिवा पेटवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

भाऊबीज एका दिवसाची, पण बहिणीच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी वर्षभराची

संपादकीय परिचय प्रो. आशा बिरारी पाटील शिक्षकतज्ञ समुपदेशक लेखिका सामाजिक कार्यकर्त्या अध्यात्मिक ऊर्जा उपचारक समाजसेवक म्हणून प्रोस्थान देतात.

No comments