adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इतिहास विभागाचे प्रमुख प्रा डॉ जगदीश खरात यांना ज्ञानश्री पुरस्काराने सन्मानित

इतिहास विभागाचे प्रमुख प्रा डॉ जगदीश खरात यांना ज्ञानश्री पुरस्काराने सन्मानित इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील ...

इतिहास विभागाचे प्रमुख प्रा डॉ जगदीश खरात यांना ज्ञानश्री पुरस्काराने सन्मानित


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय मधील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ जगदीश खरात यांना लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (CIMR) बांद्रा , मुंबई यांच्यातर्फे 'ज्ञानश्री अवॉर्ड -' हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील बावीस वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनांक ०२/१०/२०२६ रोजी मुंबई येथे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते तसेच चेतना शिक्षण संस्थेचे सचिव मा. आ. श्री शिरीषदादा चौधरी, चेतना शिक्षण संस्थेच्या (CEO) डॉ. मधुमिता पाटील , चेतना इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॉ. संदीप नेमळेकर, डॉ. शालिनी सिन्हा डॉ. संजय जगताप इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला. सदरील कार्यक्रमात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आपल्या मनोगतात मा. आ. श्री शिरीषदादा चौधरी यांनी बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी महाराष्ट्रात शिक्षण मंत्री म्हणून जे अजोड कार्य केले त्यावर प्रकाश टाकला . मा. डॉ. मधुमिता पाटील यांनी देखील बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्याकडे अर्थ, नियोजन, नगर विकास, महसूल इत्यादी प्रकारची खाती होती परंतु शिक्षण हा त्यांचा जिवापाड आवडीचा विषय होता असे नमूद केले. सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील 15 मान्यवरांना 'ज्ञानश्री 2026' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments