संत जगनाडे गो शाळेत वसू बारस उत्साहात साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा -चोपडा श्रीराम नगर येथे वसू बारस उत्साहात सं...
संत जगनाडे गो शाळेत वसू बारस उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा -चोपडा श्रीराम नगर येथे वसू बारस उत्साहात संपन्न झाली. येथील संत जगनाडे जगदीश गोपाल गो शाला व गो अनुसंधान संस्था तर्फे आयोजित या कार्यक्रमात गो मातेची विधिवत पूजा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री देवकांत के. चौधरी व त्यांच्या धर्म पत्नी सौ धनश्री देवकांत चौधरी, विश्वस्त प्रा.सूर्यकांत के चौधरी व त्यांच्या धर्म पत्नी सौ. प्रिया सूर्यकांत चौधरी, मा. नगरसेवक श्री सुनिल पांडुरंग चौधरी, श्री के. डी. चौधरी,ममता गोपाल पाटील, सौ नितु पंकज पाटील, ज्योती धनराज मराठे, कविता जितेंद्र मराठे, पूर्णिमा सूर्यकांत चौधरी, धनेश्वरी देवकांत चौधरी, प्रितम सूर्यकांत चौधरी, दुष्यन्त देवकांत चौधरी,, राजेंद्र गणपत चौधरी,ग्वाला अनिल पाटील, रवी शामराव पाटील आदिनी गो मातेची आरती गाऊन पूजा केली. गो मातांना गुड, केळी, पुरणपोळी, पोळी गुड, असे खाऊ घालून गो मातेला राष्ट्रमाता म्हणून जय जयकार केला. यावेळी मा. नगरसेवक श्री सुनिल चौधरी यांचे हस्ते ग्वाला अनिल पाटील याचा टोपी रुमाल, शाल,501रुपये देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व उपस्तितांना देवकांत चौधरी व सूर्यकांत चौधरी यांनी वसू बारसच्या शुभेच्छा दिल्या. के डी चौधरी यांनी गो माता राष्ट्र माता अशा घोषणा देऊन गो मातेचा जयजयकार केला.


No comments