महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी कामराज पैलवान यांची निवड; क्रीडा वर्तुळातून होतंय अभिनंदन! यावल (तालुका प्रतिनिधी) (संप...
महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी कामराज पैलवान यांची निवड; क्रीडा वर्तुळातून होतंय अभिनंदन!
यावल (तालुका प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती या पारंपरिक खेळाला आणि मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात यावल येथील श्रीराम नगरमधील रहिवासी असणारे कामराज रूपचंद घारू यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शकील शेख यांनी कामराज पैलवान यांच्याकडे नियुक्तीपत्र सुपूर्द केले. त्यांच्या या निवडीमुळे यावल तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
कामराज पैलवान यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल महाराष्ट्र कुस्ती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पैलवान संग्रामभाऊ कांबळे, पैलवान भानुदास विसावे, भारत भिका छपरीबंद, तसेच रावेर-भुसावळ कुस्ती संघटनेचे अध्यक्ष श्री. किशन जावळे पैलवान यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्थानिक स्तरावरही कौतुक
त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आणि निवडीबद्दल यावल येथील माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, संजय भोई, पत्रकार भरत कोळी, तसेच अंजाळ येथील यशवंत पैलवान, सुनील चौधरी आणि यशवंत पैलवान (यावल) यांच्यासह परिसरातील अनेक क्रीडाप्रेमी, नागरिक व राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
तालुक्यातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देऊन हा खेळ अधिक उंच शिखरावर नेण्यासाठी ते नक्कीच कटिबद्ध राहतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

No comments