adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक सेवेनंतर माणिकदास बेलूरकर गुरुजी सेनेतून निवृत्त; सपत्नीक भव्य सत्कार सोहळा संपन्न!

  ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक सेवेनंतर माणिकदास बेलूरकर गुरुजी सेनेतून निवृत्त; सपत्नीक भव्य सत्कार सोहळा संपन्न! वरुड (जि.अमर...

 ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक सेवेनंतर माणिकदास बेलूरकर गुरुजी सेनेतून निवृत्त; सपत्नीक भव्य सत्कार सोहळा संपन्न!




वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

जागृत नवयुवक शिक्षण संस्था, वरूडद्वारा संचालित पी. व्ही. साबळे जागृत विद्यालय, सुरळी तसेच माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, वरूड येथील सहायक शिक्षक श्री. माणिकदास बेलूरकर गुरुजी यांनी तब्बल ३१ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव करण्यासाठी यशोदाई सभागृह, वरूड येथे सपत्नीक सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बेलूरकर गुरुजी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षक सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी वरूड तालुक्यात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध रचनात्मक उपक्रम राबविले. यामध्ये ग्रंथालय व वाचक चळवळ, बाल सुसंस्कार शिबिरे, व्यायामशाळा, युवक शिबिरे, ग्रामजयंती अभियान अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. त्यांच्या या बहुआयामी योगदानामुळे त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

या सत्कार सोहळ्यात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक, राष्ट्रधर्म प्रचार समितीचे सचिव तथा माजी मुख्याध्यापक श्री. रामदास चोरोडे आणि विदर्भ साहित्य संघ व शारदा भगिनी मंडळ, वरूडच्या अध्यक्षा श्रीमती रेखा सुरेश आजनकर यांच्या शुभहस्ते माणिकदास बेलूरकर गुरुजी व त्यांच्या पत्नी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जागृत नवयुवक शिक्षण संस्था, वरूडचे माजी प्राचार्य व विश्वस्त श्री. एस. एन. बेलसरे, संस्थेचे सहसचिव प्रा. अरुण वानखेडे, डिफेन्स स्कूल ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूरचे माजी प्राचार्य श्री. शरद तिनखेडे, माजी लेखा व वित्त अधिकारी श्री. भा. रा. बेलूरकर, सौ. माया नांदूरकर, सौ. सविता बेलूरकर आणि डॉ. कार्तिक बेलूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून बेलूरकर गुरुजींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला.

यावेळी सेवाग्राम आश्रमाचे श्री. गजानन आंबुलकर, राष्ट्रीय नकलाकार श्री. हरिभाऊजी बेलूरकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. उद्धव साबळे, विदर्भ माध्यमिक संघटनेचे संघटक श्री. श्रावण बरडेसर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप बुंरंगे यांनी केले. प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय पत्रकार, लेखक तथा मुख्याध्यापक श्री. अजय देशपांडे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन श्री. सुरेंद्रकुमार यांनी केले.

या सेवापूर्ती सोहळ्याच्या यशस्वितेसाठी निमंत्रक डॉ. कार्तिक बेलूरकर, प्रशांत नागमोते, मनीष कुबडे, नितीन सिनकर, सुभाष राऊत, मोहन साबळे, जगदीश गुल्हाने, अनुराग धानोरकर, सौ. तन्वी जांभूळकर, राजू सैनी, गजानन राजनकर, महेंद्र तळखंडकर, नगर सेवक गौरव इंगळे व ज्येष्ठ पत्रकार तथा वरुड नगर पालिकेचे नगरसेवक प्रविण सावरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

३१ वर्षांच्या ज्ञानदानाच्या प्रवासातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे माणिकदास बेलूरकर गुरुजी यांचा हा सेवापूर्ती सोहळा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरला.

----------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग*

पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 

----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments