adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या २५२ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; ७.८७ लाख रुपये परताव्याचा धनादेश स्वीकारला

  फैजपूर मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या २५२ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; ७.८७ लाख रुपये परताव्याचा धनादेश स्वीकारला  इदू पिंजारी फैजपूर प्...

 फैजपूर मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या २५२ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; ७.८७ लाख रुपये परताव्याचा धनादेश स्वीकारला 



इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सहकारी साखर कारखाना लि. च्या २५२ शेतकऱ्यांची यंदा दिवाळी गोड होणार आहे. कारखान्याने २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत कपात केलेल्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेत चौथ्या टप्प्यातील ७ लाख ८७ हजार रुपयांचा परवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समितीची बैठक 2 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडली. मंत्री समितीच्या निर्णयानुसार मधुकर सहकारी साखर कारखान्याने संबंधित कालावधीत शेतकऱ्यांकडून कपात केलेल्या ठेवी परत करण्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रिया अंतर्गत चौथ्या टप्प्यात 14 ऑगस्ट 2016 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील सादर केले होते अशा एकूण २५२ शेतकऱ्यांचे परताव्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

या शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ७ लाख ८७ हजार रुपये जमा करण्यात येणार असून संबंधित रकमेचा धनादेश आजच्या समितीच्या बैठकीत स्वीकारण्यात आला त्यामुळे अनेक दिवसांपासून परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी कारखान्याच्या एकूण २३ हजार १२२ शेतकऱ्यांपैकी ६ कोटी ९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना परतावा मिळावा यासाठी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्यांची तपशील सादर केलेले नाहीत त्यांनी आवश्यक तपशील संबंधित यंत्रणेकडे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. बँक खात्यांची माहिती उपलब्ध झाल्यानंतर परताव्याची पुढील प्रक्रिया सुलभ होणार आहे या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) श्री. विशाल जाधवर समितीचे अध्यक्ष तथा प्रादेशिक उपसंचालक श्रीमती भारती ठाकूर समिती सदस्य व तृतीय विशेष लेखा परीक्षक श्री अरविंद निचळ माजी नगराध्यक्ष श्री निलेश राणे श्री ललित बोंडे आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीरत्नदीप वायकोळे उपस्थित होते. तसेच शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड साजरी होणार.

No comments