adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोन्यापेक्षा सोन्यासारख्या माणसांना जपा..ब्रह्माकुमारी मंगलादीदी (मंगलदास सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचा प्रभुचिंतन भवनतर्फे गौरवपूर्ण सन्मान)

  सोन्यापेक्षा सोन्यासारख्या माणसांना जपा..ब्रह्माकुमारी मंगलादीदी (मंगलदास सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचा प्रभुचिंतन भवनतर्फे गौरवपूर्ण सन्म...

 सोन्यापेक्षा सोन्यासारख्या माणसांना जपा..ब्रह्माकुमारी मंगलादीदी

(मंगलदास सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचा प्रभुचिंतन भवनतर्फे गौरवपूर्ण सन्मान) 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक- हेमकांत गायकवाड) 

माणसाची खरी श्रीमंती ही त्याच्याकडे असलेल्या संपत्ती वरून नव्हे तर त्याच्या विचारांवरून आणि संस्कारावरून ठरत असते. आजच्या काळात सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही सोन्यासारखे माणसे जपणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रामाणिक मंगलदास सोनवणे यांचेबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (प्रभूचिंतन भवन) चोपडा येथील संचालिका ब्रह्माकुमारी मंगलादीदी यांनी केले. प्रास्ताविकात जगन्नाथ बाविस्कर यांनी मंगलदास सोनवणे यांचा परिचय करून दिला.

       चोपडा येथील गुजरवाडी परिसरातील बँकेच्या शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी मंगलदास सोनवणे यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. बँकेत कामानिमित्त आलेल्या एका ग्राहकाची तब्बल ७५० ग्राम सोन्याच्या दागिन्यांची पिशवी चुकून बँकेतच राहिली होती. लक्षात आल्यानंतर सोनवणे यांनी सदर पिशवी सुरक्षित ठेवून बँक प्रशासनाच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज व नोंदणीच्या आधारे मूळ मालकाचा शोध घेतला. आणि सर्व खातरजमा केल्यानंतर ती पिशवी सन्मानपूर्वक परत केली. विशेष म्हणजे ग्राहकाने आनंदापोटी दिलेले १००० रुपयांचे बक्षीसही त्यांनी नम्रपणे नाकारले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ आपले कर्तव्य आणि प्रामाणिकपणा जपणाऱ्या सोनवणे यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       ह्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय प्रभू चिंतन भवन चोपडा येथे संचालिका ब्रह्माकुमारी मंगलादीदी यांच्या शुभहस्ते मंगलदास सोनवणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित शेकडों भाई बहिणींनीही सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले.

       सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी सारिकादिदी यांनी तर आभारप्रदर्शन ब्रह्माकुमारी शितलदिदी यांनी केले.

No comments