adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त दहिवद येथे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त दहिवद येथे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन विश्राम तेले (चौगाव प...

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त दहिवद येथे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन


विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात) यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.

हे चर्चासत्र नवभारत माध्यमिक विद्यालय, दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.


महात्मा फुले यांनी शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष समानतेचा दिलेला विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, तसेच समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व धार्मिक समस्यांवर सकारात्मक विचारमंथन करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग निश्चित करणे हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. निळकंठ देवचंद महाजन (माजी अध्यक्ष, श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ) व मा. श्री. नानाभाऊ पोपट महाजन (माजी सदस्य, जिल्हा परिषद व नियोजन समिती, जळगाव) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. आत्माराम कौतिक गंभीर (अध्यक्ष, श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ) राहणार आहेत.

या चर्चासत्रात शैक्षणिक विषयावर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मा. श्री. निळकंठ रामचंद्र गायकवाड, आर्थिक विषयावर मा. श्री. समाधान रतन पाटील, मा. सौ. रेखाताई गोपाल पाटील व मा. किरण दोधू महाजन, तर सामाजिक विषयावर मा. श्री. रामकृष्ण बापूराव महाजन व मा. सौ. गायत्रीताई शैलेश शेलकर हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.


 समाजाच्या प्रत्येक गावात सामाजिक जनजागृती निर्माण व्हावी, गावोगावी समाजमंडळे, महिला मंडळे व युवक मंडळे अधिक सक्षम व्हावीत, समाजातील युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक विकासासाठी योगदान द्यावे, या हेतूने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी दहिवद येथील श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,, महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.

समाजाच्या प्रगतीसाठी केवळ चर्चा नव्हे, तर विचारांचे कृतीत रूपांतर व्हावे आणि शिक्षण, संघटन व आर्थिक स्वावलंबनाच्या माध्यमातून समाजाची नवी दिशा निश्चित व्हावी, हा या चर्चासत्रामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

 या राज्यस्तरीय चर्चासत्रास महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरातमधील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुरेश महाजन, सचिव श्री किशोर राजकुळे, सह सचिव श्री योगेश महाजन, समिति प्रमुख श्री दीपक महाजन, उप प्रमुख संजय महाजन व सर्व सदस्यांनी केले आहे. 

"एक विचार… एक ध्येय… समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प!"

No comments