adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा पोलीस ठाण्याच्या नूतन प्रभारी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते थाटात उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून महिला अधिकारी मीरा देशमुख यांच्या कामाचे कौतुक ; फीत कापण्याचा मान महिला अधिकाऱ्याला

  निंभोरा पोलीस ठाण्याच्या नूतन प्रभारी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते थाटात उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिव...

 निंभोरा पोलीस ठाण्याच्या नूतन प्रभारी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते थाटात उद्घाटन

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून महिला अधिकारी मीरा देशमुख यांच्या कामाचे कौतुक ; फीत कापण्याचा मान महिला अधिकाऱ्याला


निंभोरा येथील नूतन प्रभारी अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सोबत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, डीवायएसपी अनिल बडगुजर व सपोनी मीरा देशमुख.


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील पोलीस ठाण्यातील नवनिर्मित प्रभारी अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे यांच्या शुभहस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. नवनिर्मित कार्यालयाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले व सुंदर व सुसज्ज इमारत उभारल्याबद्दल सपोनी मीरा देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. 

एक आदर्श पायंडा पाडत, महिला सक्षमीकरणाचा संदेश देत, फीत कापण्याचा मान त्यांनी स्वतः न कापता महिला अधिकारी सपोनी मीरा देशमुख यांना दिला, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास फैजपूर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील, सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश फड, निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, ममता तडवी यांच्यासह पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निंभोरा पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

निंभोरा येथील नूतन प्रभारी अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सोबत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, डीवायएसपी अनिल बडगुजर व सपोनी मीरा देशमुख.


No comments