adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाऊबीजेच्या निमित्ताने श्री गुंडाबाई मातेला सुपो महाराज व महासिद्ध महाराज संस्थानकडून साडी-चोळीची भेट बंद पडलेल्या जुन्या परंपरेला नव्याने उजाळा; कोल्ही गवळी येथे भाऊबीज उत्साहात साजरी

  भाऊबीजेच्या निमित्ताने श्री गुंडाबाई मातेला सुपो महाराज व महासिद्ध महाराज संस्थानकडून साडी-चोळीची भेट बंद पडलेल्या जुन्या परंपरेला नव्याने...

 भाऊबीजेच्या निमित्ताने श्री गुंडाबाई मातेला सुपो महाराज व महासिद्ध महाराज संस्थानकडून साडी-चोळीची भेट

बंद पडलेल्या जुन्या परंपरेला नव्याने उजाळा; कोल्ही गवळी येथे भाऊबीज उत्साहात साजरी


कोल्ही गवळी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

श्री महाबळेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र कोल्ही गवळी ता. मोताळा येथे भाऊबीजेच्या पवित्र पर्वानिमित्त श्री सुपो महाराज संस्थान व श्री महासिद्ध महाराज संस्थान यांच्या वतीने श्री गुंडाबाई मातेला साडी-चोळी अर्पण करून भाऊबीजेची जुनी परंपरा नव्याने सुरू करण्यात आली. श्री गुंडाबाई माता या श्री सुपो महाराज व श्री महासिद्ध महाराज यांच्या भगिनी असल्याची धार्मिक परंपरा असून, पूर्वीपासून चालत आलेली ही भाऊबीजेची परंपरा कालांतराने बंद पडली होती. मात्र, या परंपरेचे महत्त्व लक्षात घेऊन यावर्षी पुन्हा एकदा तिला उजाळा देत ती पूर्ववत सुरू करण्यात आली. भाऊबीजेच्या निमित्ताने दोन्ही संस्थानांच्या वतीने बहिणीच्या सन्मानार्थ श्री गुंडाबाई मातेला साडी-चोळीची भेट अर्पण करण्यात आली. यावेळी साडी-चोळी घेऊन आलेल्या दोन्ही संस्थानांच्या पुजाऱ्यांचा श्री महाबळेश्वर महाराज संस्थानच्या वतीने श्रीफळ, रुमाल व टोपी देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून केवळ धार्मिक विधी पार पडला नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी, आदर आणि परंपरेचे जतन करण्याचा सुंदर संदेशही देण्यात आला. अनेक वर्षांपासून बंद पडलेली ही परंपरा पुन्हा सुरू झाल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले.

No comments